संगमनेर: अभियंत्याच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबविली
Sangamner Crime: बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत एका कनिष्ठ अभियंत्याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून (Theft) पसार.
संगमनेर: संगमनेर येथील बसस्थानकामध्ये बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत एका कनिष्ठ अभियंत्याच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून पसार झाल्याची घटना गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली ‘माहिती अशी, राजू ठकाजी दिघे हे कोपरगाव येथील पंचायत समिती बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस आहे शुक्रवारी दुपारी ते संगमनेर बसस्थानकामध्ये गेले होते बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आल्हादप चोरून पसार झाले. दिघे हे वडगावपान फाट्याजवळ आ असता त्या दरम्यान गळ्यात चेन नसल्याचे लक्षात आले. रा दिघे यांनी चेनचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आ नाही. त्यामुळे राजू दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरू पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंब ३१३ / २०२३ भारतीय दंड संहिता कलम ३७९ प्रमाणे गुन्ह दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवा मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. चौधरी करत आहेत.
Web Title: Theft golden chain around the engineer’s neck was lengthened
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App