Home क्राईम संगमनेर: रुमवर राहणार्‍या विद्यार्थ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

संगमनेर: रुमवर राहणार्‍या विद्यार्थ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

Sangamner Crime: रुमवर राहणार्‍या विद्यार्थ्याचे दोन लॅपटॉप व दोन मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन  (Theft) नेल्याची घटना समोर.

Theft incident happened with a student living in the room

संगमनेर:  घुलेवाडी येथील साईदीप कॉम्प्लेक्स येथे रुमवर राहणार्‍या विद्यार्थ्याचे दोन लॅपटॉप व दोन मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साईनाथ शांताराम भालेराव (रा. पंतनगर, नायडु कॉलनी, घाटकोपर मुंबई, हल्ली रा. अमृतवाहिनी कॉलेज घुलेवाडी) हा विद्यार्थी साईदीप कॉम्प्लेक्स येथे रुम नंबर 7 मध्ये त्याच्या मित्रांसोबत राहत आहे. काल दि. 2 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने उघड्या रुममधून 15 हजार रुपये किमतीचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप, 20 हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, 5 हजार रुपये किमतीचा समॅसंग कंपनीचा मोबाईल, 15 हजार रुपये किमतीचा विवो कंपनी मोबाईल असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात साईनाथ भालेराव याने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक डुंबरे करत आहे.

Web Title: Theft incident happened with a student living in the room

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here