Home संगमनेर ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंद पालकाने पुरवायला पाहिजे: थोरातांचा विखेंवर निशाणा

ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंद पालकाने पुरवायला पाहिजे: थोरातांचा विखेंवर निशाणा

Breaking News | Sangamner: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांची खिल्ली उडवली.

They will take the beloved of the elder, his hobby the guardian must provide Thorat

संगमनेर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश लंके यांच्या यांच्या समोर पराभव झाल्यानंतर भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा सुजय विखेंनी व्यक्त केली आहे. यावरून आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांची खिल्ली उडवली आहे.

बाळासाहेब थोरात हे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सुजय विखे यांनी जर संगमनेरमधून निवडणूक लढवली तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे लढत होऊ शकते. तर प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. सुजय विखेंनी जर राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तर प्राजक्त तनपुरे विरुद्ध सुजय विखे सामना रंगण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंची खिल्ली उडवली आहे. ते मोठ्याचं लाडकं लेकरू आहे. त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाही तर तो पालकाने पुरवला पाहिजे. ते दोन ठिकाणी म्हटले आहेत. त्यांचा छंद पुरवण्यासाठी ते दोन्ही ठिकाणी उभे राहू शकतात. यामुळे बालकाचा छंद तर पुरा होईल, असे म्हणत त्यांनी सुजय विखे पाटलांची खिल्ली उडवली आहे. आता यावरून सुजय विखे पाटील काय पलटवार करणार?  याकडे पाहणे उचित राहील.  

Web Title: They will take the beloved of the elder, his hobby the guardian must provide Thorat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here