Home Accident News सोने व मुलाला पळविणाऱ्या चोरट्यांच्या कारने तीन दुचाकीना उडविले, दोन ठार

सोने व मुलाला पळविणाऱ्या चोरट्यांच्या कारने तीन दुचाकीना उडविले, दोन ठार

thieves' car, which was carrying gold and a child Accident Car

पाथर्डी | Accident: शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मायंबा सावरगाव मार्गावर एका शाळकरी मुलाला मारहाण करत त्याच्याकडील सोने ओरबाडून कारमधून पळणाऱ्यांचा ग्रामस्थांनी पाठलाग केला. मुलाला वृद्धे श्वर घाटात सोडले तरीही ग्रामस्थांनी पाठलाग सुरूच ठेवल्याने घाटशिरसहून मढीमार्गे जाणाऱ्या या कारने  तिसगाव बसस्थानक परिसरात तीन दुचाकी व एक पादचाऱ्याला उडविले यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.  

अपघाताची वाहने रस्त्यावरच पडून राहिल्याने मार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. या अपघातात गंगाधर सूर्यभान बुधवंत रा. शिरपूर ता. पाथर्डी, रमेश नरवडे रा. तिसगाव ता. पाथर्डी अशी दोघे मृत झाली आहे.

शुक्रवारी तीन अज्ञात तरुणांनी मायंबा सावरगाव रस्त्यावर शेताकडे जात असलेल्या चैतन्य दिलीप भगत यास अडवून कारमध्ये घेतले व चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण केली. गळ्यातील सोने, मोबाईल हिसकावून घेतला. सदर घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी कारचा पाठलाग केला. पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चैतन्यला वृद्धेशवर घाटात सोडून दिले. घाटशिरसहून ही कार तिसगावकडे भरधाव आली. तिसगाव बसस्थानक परिसरात तीन दुचाकी व एका कारसह पादचाऱ्याला जोराची धडक दिली. त्यानंतर अपहरण करणारी कार एका दुकानाला आदळून बंद पडली. त्यानंतर कारमधील तिघे जण पळून गेले. धडक बसलेल्यामध्ये दोघे जण मयत झाले. तर बाळू केदार, सचिन घोरपडे, प्रा. प्रकाश लवांडे हे जखमी झाले. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी जमावाला शांत करत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान तिसगावमधील एका इमारतीच्या छतावर लपलेल्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चैतन्य याने त्या तिघांपैकी एक असल्याचे सांगितले आहे. त्यानुळे दोघेही सापडतील असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: thieves’ car, which was carrying gold and a child Accident Car

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here