Home Maharashtra News कोरोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच: इंदोरीकर महाराज

कोरोनाची तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच: इंदोरीकर महाराज

third wave of corona is for those who remove the garland Indurikar Maharaj

लातूर: तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत कारण, आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून वाचलो. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्म झाला आहे.’ असं वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांनी केलं आहे. आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच आहे असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्या उठला. ते लातूरमध्ये आयोजित कीर्तनात बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘जग सध्या कोरोनाच्या माहामारीच्या चक्रव्यूहात अडकलं असताना आपल्याला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे ज्यांनी माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणार कोरोनाची तिसरी लाट ही आपल्यासाठी नाही असही इंदुरीकर महाराज म्हणाले.

निवृत्ती महाराज इंदुरीकर हे विनोदी किर्तनांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांच्या स्पष्टोक्ते पणामुळे तसेच बोलताना काही दाखले देण्यामुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. इंदुरीकर महाराजांनी याच्या आधीही मी कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं वक्तव्य केलं होतं यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता याबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली होती.

Web Title: third wave of corona is for those who remove the garland Indurikar Maharaj

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here