श्रीरामपूर: साडे तेरा वर्षीय मुलीला धमकावून अत्याचार
Ahmednagar News | Shrirampur: साडेतेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला धमकावून वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर.
श्रीरामपूर : शहर परिसरातील एका भागातील राहणाऱ्या साडेतेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला धमकावून वेळोवेळी अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.
याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, दोघाजणांवर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आदित्य शिवाजी चौधरी (वय २०, रा. इंदिरानगर) असे आहे.
याबाबत माहिती अशी की, बलात्कारातील मुख्य आरोपी हा अल्पवयीन असून दहावीत शिक्षण घेत आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुन्ह्यामध्ये आदित्य चौधरी याने आरोपीला मदत केली. तो मुलीला दुचाकीवर बसवून अत्याचार करणाऱ्या आरोपीकडे नेऊन सोडत असे.
Web Title: Thirteen-and-a-half-year-old girl was threatened and abused
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App