Home पुणे अजित पवारांविरोधात ‘हा’ युवा नेता मैदानात उतरणार?

अजित पवारांविरोधात ‘हा’ युवा नेता मैदानात उतरणार?

Baramati Vidhansabha Election 2024:  बारामतीत निवडणुकीच्या रिंगणात काका विरूद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार.

This' youth leader will enter the fray against Ajit Pawar

बारामती: बारामती मतदार संघात यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये फूड पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी दोन गट उदयास आले आहेत. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात कोण उभा राहणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता यासंदर्भात एक महत्वाची अपडेट्स समोर आली आहे.

बारामती विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. तर त्यांच्याविरोधात अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता बारामतीत निवडणुकीच्या रिंगणात काका विरूद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे. याशिवाय शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून ‘बारामती’ नक्की कुणाची? याची चर्चा राज्यभर होत आहे.

अशातच आता विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे बारामती या मतदारसंघातून पवार घराण्यातील कोणत्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार आहे. तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून युगेंद्र पवार विधानसभा लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र यंदा राज्याच्या राजकारणात काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात प्रचंड संघर्ष सुरु आहे. अशातच आता बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत देखील काका विरुद्ध पुतण्या अशी चुरशीची लढत होणार आहे.

Web Title: This’ youth leader will enter the fray against Ajit Pawar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here