Home अहमदनगर आ. थोरातांनी जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून सत्ताधारी भाजपला खडेबोल सुनावले

आ. थोरातांनी जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून सत्ताधारी भाजपला खडेबोल सुनावले

Ahmednagar News: जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

horat criticized the ruling BJP over politics in the district bank

अहमदनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात  यांनी जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. “श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला जिल्हा बॅंकेकडून मंजूर झालेले कर्ज ऐनवेळी थांबले गेले, पण न्यायालयाने न्याय दिला. जिल्हा बॅंक राजकारण करण्याची जागा नाही; परंतु बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी ते सुरू केले आहे,” असा आरोप आमदार थारोत यांनी केला आहे. नगर जिल्हा सहकारी बॅंकेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले हे बॅंकेचे अध्यक्ष आहेत.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज, साकुरी संस्थानच्या कन्या माधवी गुरुगोदावरी यांच्या उपस्थित झाला. आमदार थोरात यांनी त्यावेळी जिल्हा बॅंकेतील सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत सुनावले आहे.

जिल्हा बॅंकेने गणेश कारखान्याचे कर्ज रोखले असल्याची माहिती थोरात यांनी दिली. ते म्हणाले, “गणेश समोर रोज नवीन अडचणी निर्माण केल्या जात आहेत. गणेशला 40 कोटींचे कर्ज हवे होते. परंतु जिल्हा बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी तिथे राजकारण केले. विभागीय साखर सहसंचालकांनी बॅंकेला पत्र दिले आणि कर्ज थांबले. तसे कर्ज थांबवण्याचे काहीच कारण नव्हते. यावर न्यायालयात याचिका दाखल केली. तिथे जिल्हा बॅंकेला न्यायालयाने झापले. हेच 40 कोटी हाताशी असते, तर अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या असत्या” सहकारात काम करताना जिल्हा बॅंकेतील सत्ताधाऱ्यांनी कधीच राजकारण केले नाही.

विवेक कोल्हे हे भाजपमध्ये होते. त्यावेळी आम्ही तडजोड केली. आमदार अशुतोष काळे, भानुदास मुरकुटे, (कै.) जयंत ससाणे या सर्वांशी आम्ही सहकार काम करताना तडजोडीने वागलो. मात्र, बॅंकेत राजकारण कधी आणले नाही. पण आता दुर्दैवाने तसे होत आहे, असेही आमदार थोरात म्हणाले. गणेशसाठी आपली सर्वांची जबाबदारी वाढल्याचे सांगून परिसरातील शेतकरी आणि सभासदांनी गणेशलाच ऊस दिला पाहिजे, असेही थोरात यांनी या वेळी सांगितले. या वेळी गणेशच्या सभासदांना मोफत साखर वाटप करण्यात आली.

Web Title: Thorat criticized the ruling BJP over politics in the district bank

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here