Home नाशिक प्रेमसंबंधासाठी तरुणीस पळवून नेण्याची धमकी

प्रेमसंबंधासाठी तरुणीस पळवून नेण्याची धमकी

Breaking News | Nashik Crime: प्रेमसंबंध ठेवण्यासह लग्न करण्यासाठी तरुणाने २१ वर्षीय तरुणीस पळवून नेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर. (Threatening to abduct a young woman for love affair)

Threat to kidnap a young woman for love affair

नाशिक: प्रेमसंबंध ठेवण्यासह लग्न करण्यासाठी तरुणाने २१ वर्षीय तरुणीस पळवून नेण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. याप्रकरणी तरुणीने भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित ऋतिक तेजाळे (रा. मोठा राजवाडा, नाशिक) व त्याच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित ऋतिक तेजाळे याने एकतर्फी प्रेमातून पीडित तरुणीचा घर, शाळा व कॉलेज परिसरात पाठलाग केला. तरुणीने प्रेमसंबंध ठेवावेत, लग्न करावे, यासाठी संशयिताने तिला व कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१८ ते १६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला.

संशयित ऋतिकाने शनिवारी (दि. १६) काठेगल्लीतील बनकर चौकातून जाणार्‍या रस्त्यावर तरुणीला अडवले. त्याने तिचा हात पकडून जबरदस्तीने गाडीवर बसवून निसर्ग रेस्टॉरंट येथे नेऊन मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिला मारहाण करुन तिच्या घरात घुसून आईस शिवीगाळ केली. यानंतर मुलीस उचलून नेण्याची धमकी दिली. या प्रकरणात तेजाळे याच्या संशयित आईने पीडित मुलीस फोन करुन शिवीगाळ केली. त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात पोक्सोअन्वये गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Threat to kidnap a young woman for love affair

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here