शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देताच बदनाम करण्याची धमकी, मुलगी गरोदर
लोणी काळभोर: १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बदनाम करण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबध ठेवणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाच्या वाईट कृत्यामुळे मुलगी साडे पाच महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले आहे.
याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून चेतन वसंतराव कोटमाळे वय २७ रा. आळंदी रोड पुणे या तरूणाविरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १५ वर्षाची अल्पवयीन मुलगी आईबरोबर मामांकडे राहत आहे. मागील दोन महिन्यापासून मुलगी नीट जेवण करत नसल्याचे मामीच्या लक्षात आले. मामीने विचारले असता तिने काहीच सांगितले नाही. मुलीचे दात दुखत असल्याने ती जेवत नसेल असा अंदाज त्यांना वाटला. त्यांनतर तील १५ मे ला रुग्णालयात नेले. सोनोग्राफी अहवाल पाहून डॉक्टरांनी साडे पाच महिन्याची गरोदर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या आईने व मामीने विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा तिने चेतन आणि तिच्यामधील घडलेला प्रकार सांगितला.
चेतन हा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात घरी येत असे. त्यातून त्या मुलीची त्याच्याबरोबर ओळख झाली. मुलीकडे मोबाईल नंबर मागितला. तिने मात्र नकार दिल्याने बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावर घाबरून मुलीने आजीचा मोबाईल नंबर दिला. त्यनंतर फोन करून माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगू लागला. तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबध ठेवण्याचे बोलू लागला. एके दिवशी सर्व झोपल्यावर बारा वाजण्याच्या सुमारास त्याने फोन करून टेरेसवर बोलावले, तिने वाईट कृत्य करण्यास नकार दिल्यावर बदनामी करण्याची धमकी दिली. जबरदस्तीने तिच्यावर शरीरिक संबध प्रस्थापित केले. असे त्याने वेळोवेळी घडून कृत्य केले असे फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Threats of defamation as soon as he refuses to rape