Home अकोले अकोले: लग्न उरकून तीन-चार दिवस झाले नाही तोच नवरी पसार, तिघांना अटक

अकोले: लग्न उरकून तीन-चार दिवस झाले नाही तोच नवरी पसार, तिघांना अटक

Ahmednagar, Akole: बनावट लग्न (Fake Marriage) लावून फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक.

three arrested for cheating by arranging fake marriage

अकोले : अडीच लाख रुपये दिले अन् लग्नाच्या दिवशी साडेतीन तोळे सोने स्वखुशीने नवरीच्या अंगावर घातले. लग्न उरकून तीन-चार दिवस झाले नाही तोच नवरी पसार झाली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील पानसरवाडी परिसरात घडली असून, फसवणूकप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी पूजा समाधान देशमाने ऊर्फ प्रिया प्रकाश शेंडगे (रा. राहाता), सोनू खैरे ऊर्फ अभिजीत संजय पाटील (रा. आमळनेर, जि. नाशिक) आणि सविता पक्षीराम भुजबळ (रा. शाहूनगर, ता. अकोले) यांना अटक केली आहे. तर यशवंत जाधव (रा. मढ, बुलढाणा), साहेबराव माधव डांगे (रा. बोंबरे वस्ती, कोऱ्हाळे, राहाता) व निकम बाब (रा. कानमंडळ, नाशिक) हे तिघे पसार आहेत. पानसरवाडी परिसरात एका तरुणाचे लग्न जमविण्यासाठी त्याच्या वडिलांनी सविता भुजबळशी संपर्क केला होता. तिने देशमाने यांच्याकडे मुलगी असल्याचे सांगितले. पूजा ऊर्फ प्रिया यांच्याशी संपर्क साधत वधू पाहण्याचा कार्यक्रम येवला (जि. नाशिक) येथे झाला. ५ सप्टेंबर २०२२ रोजी विवाह जमविण्याची बैठक पार पडली. लग्न हे गावाकडेच करण्याचे ठरले. वधूची आई मयत, तर तिचा बाप येथे नसून तो मुलीस संभाळत नाही, असे वर पक्षाला सांगण्यात आले. पानसरवाडीमध्ये ८ सप्टेंबर २०२२ रोजी हा विवाह सोहळा पार पडला. लग्न झाल्यानंतर नवरदेवाने नोटरी करून घेतली होती. त्यात आरोपींना २ लाख ५० हजार रुपये देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.

१५ सप्टेंबर २०२२ रोजी मुलीचे बनावट मामा आणि मावशी अकोल्याला आले. त्यांनी मुलीला नांदायला ठेवायचे असेल तर दोन लाख रुपये आणखी द्यावे लागतील, असे म्हणून वाद घालणे सुरू केले. दुसऱ्या दिवशी नवरीसोबत नवरदेव आणि अन्य व्यक्ती येवला येथे गेले. त्यावेळी आरोपींनी तिच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे दागिने काढून घेतले व १७ सप्टेंबर रोजी नवरी निघून गेली. फसवणूक झाल्याचे नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर वराकडील मंडळी येवले येथील पोलीस ठाण्यात गेली. मात्र, याअगोदरच त्यांच्यावरच कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केलेली होती. प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश आहेर यांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या.

तीन लाखांची मागणी

■ प्रियाने नवरदेवाकडील मंडळीला तीन ते चार वेळा फोन करून तीन लाख रुपयांची मागणी केली.

■ हे पैसे जर दिले नाही, तर तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू आणि आमच्या मुलीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न लावून देऊ, असे म्हणून वारंवार धमकी दिली.

■ त्यानंतर पीडित नवरदेवाने १२ ऑक्टोबर २०२२ रोजी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले व सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Three arrested for cheating by arranging fake marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here