Home Maharashtra News पुण्यात हडपसरमध्ये कालव्यात तीन मृतदेह आढळून आल्याने खळबळ

पुण्यात हडपसरमध्ये कालव्यात तीन मृतदेह आढळून आल्याने खळबळ

hree Dead bodies found in canal in Hadapsar Pune

पुणे | Pune: पुणे जिल्ह्यातील हडपसरमधील कालव्यात तीन मृतदेह (Dead Bodies) आढळून आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  या कालव्यात सापडलेल्या मृतांची ओळख रात्री उशीरापर्यंत पटलेली नाही.

हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात कालव्यात एक मृतदेह (Dead Bodies) तसेच वैदुवाडी परिसरात दोन मृतदेह वाहून आल्याची माहिती रहिवाशी नागरिकांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

हडपसर भागातील जवानांनी कालव्यातून तीन मृतदेह (Dead Bodies) बाहेर काढले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आले असून  मृतांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटू शकलेली नाही. अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Three Dead bodies found in canal in Hadapsar Pune

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here