Home महाराष्ट्र विवाहितेवर तीन मित्रांचा अत्याचार, इज्जतीसाठी विवाहितेने केली आत्महत्या

विवाहितेवर तीन मित्रांचा अत्याचार, इज्जतीसाठी विवाहितेने केली आत्महत्या

Breaking news|  mangalvedha Crime: एका महिलेवर तिघा मित्रांनी अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याने तसेच यानंतर विवाहितेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने तालुका हादरून गेला.

Three friends assaulted a married woman, the married woman committed suicide

मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एका महिलेवर तिघा मित्रांनी अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आल्याने तसेच यानंतर विवाहितेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने तालुका हादरून गेला आहे.

सुरज सुभाष नकाते (वय 29), तोसिफ चाँदसा मुजाकर (वय 24), शुभम मोहन नकाते (वय 24) या नराधम मित्रांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी व पीडित महिलेचे पती कुटुंबासह पुणे येथे राहावयास होते. हे कुटुंब 28 जुलै 2024 रोजी मंगळवेढ्‌यातील मूळ गावीआले होते. यातील आरोपी हा नातेवाईक असल्याने तो नेहमी पुणे येथे फिर्यादी घरी नसतानाही ये-जा करीत असे. तो नातेवाईक असल्याने पीडितेच्या पतीला कुठलाही संशय आला नाही. यातील तिघे आरोपी एकमेकांचे खास मित्र आहेत. 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी मयत विवाहिता तिच्या आईला भेटण्यासाठी जाऊन येते, असे सांगून गेली होती. दुपारी गावातील एका नागरिकाने पीडितेच्या पतीला फोन करून पीडितेचा मृतदेह तलावात आढळल्याची माहिती दिली. हे कळताच फिर्यादी तत्काळ घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल व चप्पल दिसली. नागरिकांच्या मदतीने पीडित महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. मात्र, ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Three friends assaulted a married woman, the married woman committed suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here