Home Accident News अहमदनगर: तीन मोटारसायकलच्या विचित्र अपघातात तिघे ठार- Accident

अहमदनगर: तीन मोटारसायकलच्या विचित्र अपघातात तिघे ठार- Accident

Shrirampur Accident News:  तीन मोटारसायकलचा विचित्र अपघात, डॉ. सचिन हापसे यांचे चिंरजीव राजवर्धन सचिन हापसे (वय 21) यांचा मृत्यू.

Three killed in a freak accident involving three motorcycles

श्रीरामपूर: नगर पुणे रस्त्यावर शिक्रापूर जवळ असलेल्या मिल्टन कंपनीजवळ तीन मोटारसायकलचा विचित्र अपघात घडला. या अपघातात श्रीरामपूरच्या तरुणासह तिघे ठार झाले आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.

शहरातील डॉ. सचिन हापसे यांचे चिंरजीव राजवर्धन सचिन हापसे (वय 21) हा पुणे येथील बी आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान महाविद्यालयास सुट्टी असल्यामुळे राजवर्धन पुणे येथून श्रीरामपूरकडे मोटारसायकलवरुन येत असताना शिक्रापूरजवळच मिल्टन कंपनीजवळच भरघाव वेगात असलेले कारखाना कामगार अचानक मोटरसायकलवर आडवे घुसल्यामुळे भिषण अपघात झाला.

मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर त्याचेवर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन हापसे यांचा राजवर्धन एकुलता एक मुलगा होत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Three killed in a freak accident involving three motorcycles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here