अहमदनगर ब्रेकिंग: उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून अपघातात तिघांचा मृत्यू
Ahmednagar Accident: उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना.
श्रीगोंदा: उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून तीन तरुणांचा मृत्य झाला आहे. दौंड – पाटस रोडवर दि.१३ रोजी रात्री अपघात (Accident) घडला.
मयत झालेल्यांमध्ये ऋषिकेश महादेव मोरे (वय २६ ), स्वप्निल सतिष मनुचार्य (वय२४), गणेश बापु शिंदे (वय २५) याचा समावेश आहे. तिघेही काष्टी बाजारतळ येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.
ऊसाच्या ट्रकटर ट्रॉली मधून कारखान्याना होणारी वाहतूक दिवसेन दिवस धोकादायक होत असून मागील वर्षी अश्याच प्रकारे मागून जुगाडला धडकून एका तरुणांचा मृत्यू झाला होता. अश्या घटना रोजच घडत असताना ट्रॉलीला मागून रिफ्लेकटर लावलेली नसतात, प्रमाणापेक्षा जास्त ऊस वाहतूक करताना मोठ्या आवाजत लावलेली टेप रेकॉर्ड आणि धुंदीत ऊस वाहतूक करणारे ट्रकटर चालक यांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो अपघात झाले आहेत.
Web Title: Three killed in an accident involving a sugarcane tractor
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App