Home महाराष्ट्र ट्रक-कार अपघातात नववधूसह तीन ठार

ट्रक-कार अपघातात नववधूसह तीन ठार

Breaking News | Accident:  भरधाव कार आणि ट्रकच्या झालेल्या ‘भीषण अपघातात कारमधील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू.

Three killed including bride in truck-car accident

भिगवण:  भरधाव कार आणि ट्रकच्या झालेल्या ‘भीषण अपघातात कारमधील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणनजीक स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी आहेत. राधिका अजय मस्के (२२), राजू बाबूराव मस्के (५२, रा. अंबिकानगर, चिंचवड, पुणे), बाबासाहेब दत्तात्रय धेंडे (४८, रा. ज्योतिबावाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चालक अजय राजू मस्के व त्यांची बहीण काजल राजू मस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. मस्के कुटुंबीय हे पुण्याहून उस्मानाबाद येथे कामानिमित्त निघाले असता, हा अपघात झाला, यामध्ये नवविवाहिता राधिका मस्के हिचा मृत्यू झाला. यातील जखमी अजय व मृत राधिका यांचा विवाह जानेवारीत झाला होता.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

रावणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणारी सेलेरियो कार ही ओव्हरटेक करताना पुढे चाललेल्या ट्रकला पाठीमागून उजव्या बाजूस धडकली. यात कारमधील चालकाशेजारी बसलेली त्याची पत्नी राधिका आणि पाठीमागे बसलेले चालकाचे वडील राजू मस्के दोघे जागीच ठार झाले. तर, उपचारादरम्यान बाबासाहेब धेंडे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रावणगाव पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच भिगवण येथील आपुलकीची सेवा रुग्णवाहिकेचे चेतन वाघ यांनी धाव घेत रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी रावणगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस हवालदार नवनाथ भागवत, गोरख मलगुंडे तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस फौजदार वसंत कदम, संतोष काळे, पोलीस हवालदार उमेश लोणकर, पोलीस नाईक नितीन वाघ हे घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी व मृत व्यक्तींना त्यांनी बाहेर काढले. पुढील तपास रावणगाव पोलीस करत आहेत.

Web Title: Three killed including bride in truck-car accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here