Home जळगाव हृदयद्रावक ! सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू

हृदयद्रावक ! सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू

Breaking News | Jalgaon: धरणात पोहण्याचा मोह बेतला जिवावर, दोन तरुणांसह तीन जणांचा बुडून मृत्यू.

Three people drowned, including Sakkhya brothers

जळगाव: पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांसह तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. यातील दोन सख्खे भाऊ आहेत. तर तिसरा त्यांचा आतेभाऊ आहे. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत.

: मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन (१२), मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन (१६, दोघे रा. बडा मोहल्ला, पारोळा) आणि आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन (१४, रा. रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी मृत मुलांची नावे आहेत. पारोळानजीक भोकरबारी धरणात हसनसह पाच जण पोहायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. आवेस हा दोन दिवसांपूर्वीच मालेगावहून नातेवाईक यांच्याकडे आला होता. यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्याचा आतेभाऊ होता. तो मालेगावहून येथे आला होता.

Web Title: Three people drowned, including Sakkhya brothers

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here