Home संगमनेर संगमनेर: जमावाकडून तिघांना बेदम मारहाण, शहरांमध्ये वातावरण तणावपूर्ण

संगमनेर: जमावाकडून तिघांना बेदम मारहाण, शहरांमध्ये वातावरण तणावपूर्ण

Breaking News | Sangamner Crime: तिघांना जमावाकडून बेदम मारहाण, या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

Three people were brutally beaten by the mob

संगमनेर: संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोड येथे तिघांना जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगळवार दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले असून यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात दुसऱ्या गटाने मोठी गर्दी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोल्हेवाडी रोड येथील राहुल सोपान गुंजाळ हा तरुण दुचाकीवरून आपल्या दोन मुलींना घेऊन संगमनेरकडे येत होता. सायंकाळी दिल्ली नाका येथील कोल्हेवाडी रोड येथे आला असता त्याच दरम्यान पिकअप चालकाने दुचाकीला कट मारला. त्यावेळी गुंजाळ हा तरुण कट का मारला ? असे विचारण्यासाठी पिकअप चालकाकडे गेला असता त्यावेळी उलट पिकअप चालकाने गुंजाळ यांना मारहाण केली आहे. त्यावेळी गुंजाळ यांच्या लहान मुलींनी मोठ्याने आरडाओरड केली. अशा परिस्थितीतही आणखी काहीजण आले आणि त्यांनीही राहुल गुंजाळ (वय ३८), संदीप गुंजाळ (वय ३८) आणि अमोल गुंजाळ ( वय ३२) (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) या तिघांना मारहाण केली. त्यानंतर गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात  येऊन झालेली घटना सांगितली. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, या घटनेची माहिती दुसऱ्या जमावाला समजताच त्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी घटनेने बाताबरण तणावपूर्ण बनले होते. तर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. यापूर्वी जोर्वे नाका येथे अशीच घटना घडली होती. त्यानंतर येथील सर्व अतिक्रमण काढून याठिकाणी पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून पोलीस चौकी बांधण्यात आली होती. मात्र पोलीस चौकी बांधल्यापासून आजपर्यंत बंद अवस्थेत आहे. त्यामुळे आता तरी बंद असलेली पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

मंगळवारी सायंकाळी दिल्ली नाका कोल्हेवाडी रोड येथील घटनेसंदर्भात पोलीस विभागाकडून गंभीर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येईल. कोणीही शहरात अफ़वा पसरवू नये शांततेचे पालन करावे.

सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक संगमनेर

Web Title: Three people were brutally beaten by the mob

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here