Home Accident News धावत्या टॅंकरमधील एसिड उडून तीन जण जखमी

धावत्या टॅंकरमधील एसिड उडून तीन जण जखमी

Ulhasnagar news

उल्हासनगर : सल्फयुरिक एसिडने भरलेल्या टँकर चालकाने भर चौकात अचानक ब्रेक मारल्यामुळे एसिड बाहेर पडून तीन जणांच्या अंगावर उडाले. यामध्ये दिलीप पुरस्वानी आणि भरत वसीटा हे दोघे गंभीर स्वरूपात भाजले गेले असल्याचे समजते. या गंभीर घटनेबाबत पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरच्या (Ulhasnagar)श्री राम चौक परिसरात ही दुर्घटना घडली होती. यानंतर घटनास्थळी पोहोचत विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकर चालकास लगोलग ताब्यात घेतले. टँकरचे झाकण अश्या पद्धतीने लिकेज होणे तसेच ऍसिडने भरलेला टँकर रहदारीच्या परिसरातून घेऊन जाणे ही निष्काळजीपणाची बाब आहे. यामुळे दोन जणांना गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. म्हणूनच निष्काळजीपणा करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कठोर कारवाई करतात.

दुचाकी चालवत असताना अथवा रस्त्यावरून पायी चालत असताना अश्या प्रकारच्या अवजड वाहना पासून शक्यतो सुरक्षित अंतर ठेवणे आपल्याच हिताचे आहे. या अगोदरही रस्ते अपघातात अनेक दुचाकीस्वाराचा अवजड वाहनांशी अपघात होऊन स्वतःचा जीव देखील गमवावा लागला आहे. उल्हासनर येथील या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ माजली होती.

Web Title : Three people were injured when acid flew from a running tanker

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here