धक्कादायक! तरुणीला धमकावून तिघांनी केला अत्याचार
Pune Crime News: तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना पुण्यातून समोर आली आहे.
पुणे: तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना भारती विद्यापीठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पीडित तरुणीची मैत्रीण (वय २१), तिचा मित्र (वय २८) यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने खोटे बोलून मित्राच्या घरी नेले. त्यानंतर मैत्रिणीने तरुणीला ‘तुला या तिघांसमवेत थांबावे लागेल, अन्यथा तुला जीवे मारू’ अशी धमकी दिली. त्यानंतर तिघा तरुणांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. आरडाओरडा केल्यास मारण्याची धमकी दिली. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात करीत आहेत.
Web Title: three threatened the young woman and sexually abused her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News