Home Crime News Murder: तीन वर्षांच्या चिमुरडीचा गळाआवळून खून

Murder: तीन वर्षांच्या चिमुरडीचा गळाआवळून खून

Pune Crime: तीन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून (Murder) केल्याचा प्रकार उघडकीस.

three-year-old girl was killed by strangulation

पुणे:  अडीच ते तीन वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी येथील सीएएफव्हीडी मैदानाजवळ अनोळखी मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीच्या गळ्यावर बोटांचे ठसे आढळले. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुलीची ओळख अद्याप पटली नाही. अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार या रस्त्याच्या दक्षिणेला असलेल्या सीएएफव्हीडी मैदानावर तीन वर्षांची मुलगी बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून खडकी पोलिसांना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता मिळाली.

Web Title: three-year-old girl was killed by strangulation

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here