राजूर: आयशर गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू
Breaking News | Akole: कोल्हार घोटी राज्यमार्गावर गॅस टाक्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना.
राजूर: राजूर परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोल्हार घोटी राज्यमार्गावर गॅस टाक्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील मवेशी येथील प्रथमेश नामदेव किरवे, विलास रामा कवटे, प्रवीण रामा भांगरे या तिघांचा मृत्यू झाला आहे.
हे तिघे दुचाकीहून राजूर हून कोल्हार घोटी महामार्ग मवेशीकडे निघाले होते. यावेळी भारत गॅस टाक्यांची वाहतूक करणाऱ्या एम.एच. १७ बी. वाय. ५३५८ या क्रमांकाच्या आयशर गाडीने राजूर गावाच्या परिसरात एका वळणावर जोराची धडक दिली. ही धडक जोराची असल्याने मोटारसायकल वर असणाऱ्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात जात असताना मृत्यू झाला. यावेळी ही धडक जोराची होती. नागरिकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविले मात्र रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली. यावेळी राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक व्यवस्था सुरळीत करीत अपघातातील वाहने ताब्यात घेतली. प्रथमेश नामदेव किरवे, विलास रामा कवटे, प्रवीण रामा भांगरे या तिघांच्या मृत्यूने अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Three youths died in a terrible accident involving an Eicher and a two-wheeler Accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study