Home पुणे खळबळजनक: भरदिवसा गोळीबाराचा थरार, चालत्या बाईकवर पाच जणांवर फायरिंग

खळबळजनक: भरदिवसा गोळीबाराचा थरार, चालत्या बाईकवर पाच जणांवर फायरिंग

वारजे परिसरात भरदिवसा दहशत मजवण्यासाठी विरोधी टोळीवर गोळीबार (Firing) केल्याचा धक्कादायक प्रकार.

Thrill of shooting in broad daylight, firing on five people on a moving bike

पुणे : पुण्यातल्या वारजे परिसरात भरदिवसा दहशत मजवण्यासाठी विरोधी टोळीवर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका तरुणाच्या पायाला गोळी चाटून गेल्याने तो जखमी झाला आहे.

या प्रकरणात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा प्रकार पुण्याील वारजे परिसरातल्या रामनगर टाकी चौक येथे घडला आहे. दुपारच्या साडे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुरज तात्याबा लंगार (वय २१, रा. वारजे माळवाडी) असं जखमी झालेल्याचं नाव आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचं सांगण्यात येत आहे. वारजे परिसरातल्या रामनगर टाकी चौक येथे पाच मुलांची टोळी आपापसात गप्पा मारत होती. त्या ठिकाणी गाडीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्या दिशेने गोळीचे ५ राऊंड फायर केले. गोळ्या झाडत असताना एका तरुणाच्या पायाला एक गोळी चाटून गेली.

जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात पाहणी केली. पूर्ववैमनस्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. अद्याप कोणताही आरोपी हाती लागला नाही. या प्रकरणी अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Thrill of shooting in broad daylight, firing on five people on a moving bike

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here