Home अहमदनगर अहमदनगर: बसच्या टायरने घेतला पेट अन पुढे झाले असे काही…

अहमदनगर: बसच्या टायरने घेतला पेट अन पुढे झाले असे काही…

Ahmednagar News:  लाल परीच्या मागील टायरने अचानक पेट (Fire) घेतला. काही क्षणातच गाडीला आग लागल्याचे चालकाच्या अन् वाहकाच्या लक्षात आले , आगीवर नियंत्रण मिळवल्याने काही क्षणात आग आटोक्यात आली,  अग्निशामक पथक आमच्यासाठी देवदूत.

tire of the bus caught fire and something happened

राहता: पुणे येथून मनमाड करिता जाणारी बस रात्री अडीच वाजेची वेळ होती. बस मध्ये अनेक प्रवासी झोपेत होते. अन लाल परीच्या मागील टायरने अचानक पेट घेतला काही क्षणातच गाडीला आग लागल्याचे चालकाच्या अन् वाहकाच्या लक्षात आले. सर्व प्रवासी लालपरी तून सुखरूप खाली उतरवले अन्यथा मोठ्या दुर्दैवी घटनेला सामोरे जाण्याची वेळ आली असती. आग लागल्याची घटना समजताच राहाता नगरपालिकेचे अग्निशामक विभाग प्रमुख अशोक साठे आपल्या अग्निशामक पथकासह रात्री अडीच वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले नी आगीवर नियंत्रण मिळवल्याने काही क्षणात आग आटोक्यात आली अन् आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून उद्ध्वस्त होणारी लालपरी सुद्धा वाचली. ही घटना मंगळवारी घडली. वाहन चालक वाहक व प्रवासी या सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे मनमाड ही लालपरी बस पुण्याहून मनमाडकडे जात असताना नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्गावर पिंपरी निर्मळ हद्दीतील हॉटेल विश्वदीप जवळ या गाडीचे मागील टायरला रात्री अडीचच्या सुमारास आग लागली होती. टायरने जोरदार पेट घेतला आगीच्या ज्वाला निघत होत्या. दरम्यान बस मधील अनेक प्रवासी हे साखर झोपेत होते. ही आग लागल्याची बस चालकाच्या निदर्शनास येतात त्यांनी बसवर ताबा मिळवत बस एका कडेला थांबवली व तातडीने सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. लगेचच ही घटना दूरध्वनीवरून राहाता नगरपालिकेचे अग्निशामन विभाग प्रमुख अशोक साठे व त्यांच्या सहकार्‍यांना समजली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता एवढ्या रात्री अग्निशामक घेऊन आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले व तातडीने टायरमुळे पेट घेतलेल्या बसची आग आटोक्यात आली. त्यामुळे लाल परी वाचलीच परंतु होणारी मोठी दुर्घटना सुद्धा टळली.

एवढ्यावरच न थांबता अशोक साठे व त्यांच्या सहकार्‍यांनी लाल परीचे चालक व वाहक यांच्या मदतीने मध्य रात्रीच्या वेळी सर्व प्रवाशांना धीर देत या प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसून पुढील प्रवासासाठी त्यांची वाटचाल करून दिली. काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती केवळ दैव बलवत्तर म्हणून मध्यरात्री संबंधित लाल परीचे चालक व राहत्याचे अग्निशामक पथक आमच्यासाठी देवदूत म्हणून आल्याची भावना व्यक्त करत प्रवाशांनी या सर्वांचे आभार मानत आपला प्रवास सुरू केला. स्थानिकांनी व राहता नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने मोठी मदत केली ही मदत न विसरणारी असल्याचे बस चालकाने सांगितले.

Web Title: tire of the bus caught fire and something happened

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here