Home Crime News संगमनेर घटना: सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या

संगमनेर घटना: सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या

Sangamner Suicide News: सासरच्या छळास कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. तिघांवर गुन्हा दाखल.

Tired of torture by father-in-law, commits suicide

संगमनेर:  सासू व सासर्‍यांच्या छळाला कंटाळून जावयाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्याघटना घडली आहे.  ही घटना काल सकाळी सहा वाजेपूर्वी शहरातील कतार वस्ती येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कतार वस्ती येथे राहणार्‍या लहू पवार याला गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी, सासू व सासरे यांच्याकडून त्रास सुरू होता. वेळोवेळी अपमान करून शिवीगाळ करणे, मारहाण करून उपाशीपोटी ठेवणे, असा त्रास त्याला दिला जात होता. या त्रासाला कंटाळून त्याने काल सकाळी सहा वाजे पूर्वी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

याबाबत अलका बापू पवार हिने शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी मयत लहू पवार याची पत्नी काजल पवार, सासू अनिता चंद्रकांत धोत्रे, सासरे चंद्रकांत शामराव धोत्रे सर्व रा. कतार वस्ती संगमनेर यांच्याविरुद्ध गुन्हा र.नं.82/2023 भादंवि. कलम 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Tired of torture by father-in-law, commits suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here