Home संगमनेर संगमनेर: वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

संगमनेर: वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला

Breaking News | Sangamner Crime: चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर घारगाव पोलिसांच्या पथकाने कारवाई करून ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त.

tractor carrying sand was caught

संगमनेर: तालुक्यातील कौठे मलकापूर शिवारात रविवार दि. २४ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चोरून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर घारगाव पोलिसांच्या पथकाने कारवाई करून ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिंदोडी फाटा येथून कौठे मलकापूर शिवारात चोरून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने छापा टाकला असता विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून स्वप्नील संजय आंबेकर (वय ३०, रा. आंबेकर वस्ती, साकूर) हा एक ब्रास वाळू घेऊन जात होता. पोलिसांनी वाळू व ट्रॅक्टर- ट्रॉलीसह ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी स्वप्नील आंबेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: tractor carrying sand was caught

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here