Home Accident News ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Tragic death of a biker who was crushed under a truck

कल्याण : शहराच्या (Kalyan) बाहेरील अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील मलंगगड भागात आज सकाळी ११:३० च्या दरम्यान एक भीषण अपघात झाला. खोणी तळोजा महामार्गावर मालवाहतूक ट्रक आणि दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. खोणी तळोजा महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. (Road Accident Today)

आज सकाळी झालेल्या अपघातात जवळच्याच पाली गावातील रवी ठाकरे नामक इसमाचा मृत्यु झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित राहत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. सध्या ट्रकचालक फरार असून पोलिसांनी क्लिनरला ताब्यात घेऊन फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. सध्या पोलिसांनी अपघात झालेला ट्रक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. खोणी तळोजा महामार्गावर या अगोदरही अनेक भीषण अपघात झालेले आहेत. मागील महिन्यात देखील त्याच ठिकाणी ट्रक व एर्टिगा गाडीत धडक झाली होती. त्यात 3 ते 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अशी माहिती तेथील स्थानिक संदेश दाभणे यांनी दिली आहे

Web Title : Tragic death of a biker who was crushed under a truck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here