अहमदनगर: ट्रॅव्हल बस पलटी, अन दुचाकीस्वराची बसला धडक
Ahmednagar News: पाथर्डी रोडवरील टाकळी फाटा येथील घटना, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात.
पाथर्डी: तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील टाकळी फाटा येथील धोकेदायक वळणावर आज (दि. १२) पहाटेच्या सुमारास एक ट्रॅव्हल्स उलटल्याने या घटनेत चार प्रवासी जखमी झाले.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून पलटी झालेल्या ट्रॅव्हलला धडकून एक दुचाकीस्वार सुद्धा जखमी झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे पाचच्या सुमारास बीड येथून मुंबई येथे चाललेली असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला अन् ही ट्रॅव्हल पलटी झाली. रस्त्याच्या मधोमध ट्रॅव्हल उलटल्याने काही वेळ येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. या घटनेत नांदेड जिल्ह्यातील चार प्रवासी जखमी झाले असून त्यांना
पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर यातील एकाला पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान पलटी झालेल्या ट्रॅव्हलला दुचाकीवरून गेवराईकडे जाणाऱ्या एका तरुणाने धडक दिल्याने तो सुद्धा जखमी झाला. याठिकाणी नव्याने बनवण्यात आलेले वळण धोकादायक झाले असून मागील आठवड्यात याच ठिकाणी रस्त्याच्याकडेला आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत असलेल्या ऋषिकेश फुंदे या तरुणाला आयशर टेम्पोने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता.
Web Title: travel bus overturned, a two-wheeler hit the bus Accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App