Home औरंगाबाद Gang Rape | धक्कादायक! आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार, सहा जणांना अटक

Gang Rape | धक्कादायक! आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार, सहा जणांना अटक

Aurangabad Gang Rape:  सहा जणांनी घरात घुसून आळीपाळीने बलात्कार, कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी.

Tribal girl gang rape, six arrested

औरंगाबाद:  राज्यात भंडारा जिल्ह्यातील सामुहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात एका गावात सहा नराधमांनी अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे.

याबाबत पिडितेच्या आईनं पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.  शनिवारी पिडिता दुपारी तीन वाजेच्या सुमारास  एकटी घरी असताना सहा जणांनी घरात घुसून अल्पवयीन मुलीवर आळीपाळीनं बलात्कार केला आहे, यातील काही आरोपींनी आधीपासूनच पिडितेवर नजर ठेवली होती, तर काहींनी आधी पिडितेला छेडलं होतं, असं पिडितेच्या आईनं पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच बलात्कार (Rape) केल्यानंतर आरोपींनी पिडितेला कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यानं पिडित मुलीनं याबाबत कुणालाही काही सांगितलं नाही.

आई कामावर गेलेली असताना मुलीसोबत हे कृत्य घडले आहे. पिडीतेची आई घरी नसल्याच्या संधीचा फायदा घेत आरोपींनी घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घाबरलेल्या पिडितेनं तिच्यासोबत झालेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला, आपल्या मुलीवर सहा जणांनी वारंवार बलात्कार केल्याचं समजताच पिडितेच्या आईला धक्का बसला. त्यानंतर त्यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीनं कारवाई करत सहा आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता सर्व आरोपींना येत्या १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

Web Title: Tribal girl gang rape, six arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here