अहमदनगर: मालट्रक आणि कारची समोरासमोर अपघात, युवकाचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar Accident: मालट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू.
अहमदनगर: नगर- दौंड महामार्गावर हिवरेझरे (ता. नगर) गावाजवळ काल, बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मालट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. कारचा चक्काचूर झाला आहे. मयत व जखमी हे सर्वजण छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. महामार्गावरील खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेला आहे.
आदेश राधाकिसन डाकरे असे मयताचे नाव असून जखमींची नावे समजू शकली नाहीत. हे सर्वजण कारने (एमएच 20 ईवाय 1012) नगरहून दौंडकडे जात होते. सकाळी आठच्या सुमारास हिवरेझरे (काळेवाडी) शिवारात 14 मैल जवळ दौंडकडून भरधाव वेगात नगरकडे येत असलेल्या मालट्रकची (एचआर 55 व्ही 4478) आणि कारची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील जखमी अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली.
बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मयत व जखमींना कारच्या बाहेर काढण्यात यश आले. स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णवाहिकेतून नगरला पाठविले. नगर तालुका पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तसेच महामार्ग पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मालट्रक चालक सलीम मोहंमद (रा. मणिपूर) याला ताब्यात घेतले आहे. नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद फाट्यावर मागील आठवड्यात खासगी आराम बस उलटून भीषण अपघात झाला होता. त्यात दोघांचा मृत्यू तर 5-6 प्रवासी जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी पुन्हा एका भीषण अपघात झाला आहे.
Web Title: Truck and car face-to-face accident, youth dies
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study