Home महाराष्ट्र ट्रकने ऑटोला चिरडले; चार ठार, तीन जखमी

ट्रकने ऑटोला चिरडले; चार ठार, तीन जखमी

Breaking News | Vardha Accident: अज्ञात ट्रकने आटोरिक्षाला अक्षरशः चिरडले. या अपघातात ऑटोमधील दोघांचा जागीच, तर दोघांना उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू.

Truck crushes auto Four killed

पुलगाव |वर्धा: येथून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा मार्गावरील केळापूर गावाजवळ अज्ञात ट्रकने आटोरिक्षाला अक्षरशः चिरडले. या अपघातात ऑटोमधील दोघांचा जागीच, तर दोघांना उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. इतर तीन गंभीर जखमींवर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना सोमवारी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास घडली. दुर्गाबाई सुरेश मसराम, सतीश नेहारे, सुमित्रा करोती आणि भीमराव पाटील, अशी मृतकांची नावे आहेत.

सर्व मृतक केळापूर येथील रहिवासी आहेत. ट्रकच्या धडकेत आटोरिक्षाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आहे. ऑटोमधील साक्षी नरोडे या महिलेचे दोन्ही पाय फॅक्चर झाले आहेत.

Web Title: Truck crushes auto Four killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here