अहमदनगर ब्रेकिंग: घाटात ट्रक-दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू
Ahmednagar News: कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना. दोघांचा मृत्यू.
पाथर्डी: कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रक आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहन चालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहे.
शिवाजी नानासाहेब भवार (रा. निवडूंगे ता. पाथर्डी) व जावेद शेख (रा. विहामांडवा ता. पैठण) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋषिकेश मोटकर व गणेश गाभूर हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुध टँकरचा भीषण अपघात झाला. अपघात झालेला ट्रक पैठणवरुन शेंगदाण्याचे कट्टे घेऊन नगरकडे चालला होता. तर दुधाचा रिकामा टँकर करंजीकडे येत होता. दोन्ही वाहने करंजी घाटात आली असता समोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की दोन्हीही वाहनांचा अक्षरशः चक्काकूर झाला.
Web Title: Truck-milk tanker head-on collision in Ghat; Both drivers died on the spot Accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App