Home Maharashtra News अखेर कोरोनाने मला गाठलचं: तृप्ती देसाई

अखेर कोरोनाने मला गाठलचं: तृप्ती देसाई

Trupti Desai Corona Positive

मुंबई | Corona: राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अनेक बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील कलाकार तसेच बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.  गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या राजकीय नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई  यांना देखील करोनाची बाधा झाली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

त्या म्हणल्या की,  अखेर “कोरोनाने” मला गाठलचं माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते. जेंव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा असे आवाहन तृप्ती देसाई यांनी केले आहे.

Web Title: Trupti Desai Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here