Home संगमनेर संगमनेरातील घटना: पोलीस असल्याचे सांगत घर लुटण्याचा प्रयत्न

संगमनेरातील घटना: पोलीस असल्याचे सांगत घर लुटण्याचा प्रयत्न

Sangamner News:  मध्यरात्री चोरी (Rob) करण्याच्या उद्देशाने दोघांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

Trying to rob a house claiming to be the police

संगमनेर: संगमनेर खुर्द येथे पोलीस असण्याचा बहाणा करून दोघांनी घर लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. पोलीस असल्याचे सांगून मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने दोघांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणाच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. ही घटना संगमनेर खुर्द परिसरात काल रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संगमनेर खुर्द परिसरात राहणार्‍या प्रशांत गुंजाळ यांच्या घरी काल रात्री पावणे एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. गुंजाळ यांच्या घराची बेल एकाने वाजवली. बेलच्या आवाजाने गुंजाळ झोपेतून जागे झाले. त्यांनी दरवाजा जवळ येऊन पाहिले असता दोघेजण घराबाहेर उभे होते. आम्ही अकोले येथील पोलीस असून तपास करण्यासाठी आलो आहोत असे त्यांनी सांगितले. गुंजाळ यांच्या घरी चार वर्षांपूर्वी चोरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला नाही.

एवढ्या रात्री कशाचा तपास करताय असे त्यांनी त्या व्यक्तीला विचारले. एका महिलेचा आम्हाला तपास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. हे दोघे चारचाकी वाहनांमध्ये आले होते. गुंजाळ यांनी दरवाजा न उघडता मित्रांना फोन केला. यानंतर हे दोघेजण आपल्या वाहनासह निघून गेले.पोलिसांच्या वेशातील हे चोरटे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. गुंजाळ यांनी प्रसंगावधान राखून घराचा दरवाजा न उघडल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. घराच्या बाहेर फारसा उजेड नसल्याने त्यांना गाडीचा क्रमांक दिसला नाही. पोलीस असल्याचे सांगणार्‍या या दोघांनी आणलेल्या वाहनावर लाल दिवाही होता. यामुळेच ते नेमके कशासाठी आले होते या गोष्टीचा उलगडा होऊ शकला नाही.

Web Titie: Trying to rob a house claiming to be the police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here