Home संगमनेर संगमनेर: कारने दोन दुचाकीना उडविले

संगमनेर: कारने दोन दुचाकीना उडविले

Breaking News | Sangamner Accident: भरधाव कारची दोन दुचाकींना धडक, चौघे जखमी.

Two bikes were blown away by the car Accident 

संगमनेर : भरधाव कारची दोन दुचाकींना धडक बसली. यात दुचाकीहून प्रवास करणारे दोन पुरुष आणि दोन महिला असे चौघे जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (दि.१९) सकाळी ९ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार परिसरात हॉटेल वनश्री समोर घडला. जखमींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

दुचाकीवरील (क्रमांक एम.एच. १७, ए.टी. १८२८) चालक विवेक संभाजी काळे (वय ३२, रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर), दुचाकी (क्रमांक एम.एच. १२, बी.एफ. १९९७) वरील नाना लक्ष्मण मोहन (ता. जुन्नर, जि. पुणे) पाठीमागे बसलेल्या राणी लुक्कड, सुनीता खरे अशी जखमींची नावे आहेत. हे दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या कारची (एम.एच. १२, व्ही.टी. ९४२३) दोन्ही दुचाकींना जोराची धडक बसली. कारचालक मनमित सिंग यास कार कंट्रोल न झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे. नाना मोहन हे अपघातात गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीहून प्रवास करणारे इतर तिघेही किरकोळ जखमी आहे. झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रमुख, सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलविली. अपघाताची घटना घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने महामार्ग पोलिसांनी त्याबाबत घारगाव पोलिसांना कळविण्यात आले आहे.

Web Title: Two bikes were blown away by the car Accident 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here