अहिल्यानगर: कटलेल्या पतंगाच्या मागे धावताना विहिरीत पडून दोन मुलांचा मृत्यू
Breaking News |Ahilyanagar: कटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
अहिल्यानगर: पतंग उडवितेवेळी कटलेला पतंग पकडण्यासाठी पळत असताना दोन मुलांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच अहिल्यानगर तालुक्यातील पोखर्डी शिवारात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
अनिकेत रतन आल्हाट (वय ११) व दिनेश विशाल देठे (वय १०) अशी मयत मुलांची नावे आहेत. पोखर्डी गावा जवळच चंद्रकांत सुंदर देठे यांची शेत असून त्याठिकाणी त्यांची विहीर आहे. शाळेला सुट्ट्या असल्याने काही मुले शुक्रवारी सायंकाळी देठे यांच्या विहिरीपासून जवळच पतंग उडवित होते. त्यातील एक पतंग कटल्याने तो पकडण्यासाठी अनिकेत व दिनेश पतंगाच्या दिशेने पळत सुटले व ते दोघे विहिरीत पडले.
त्यांच्या सोबत असलेल्या इतर मुलांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी दोन्ही मुलांना विहिरीतून तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाच वेळी दोन कुटुंबातील मुलांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात नागरिक त्या ठिकाणी जमा झाले. एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
Web Title: Two boys died after falling into a well while running after a cut kite
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News