दोन कारचा अपघात; ६ जण ठार तीन जण गंभीर जखमी
Breaking News | Akola Accident: उड्डाणपुलाजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. (Six Death)
अकोला: अकोला- वाशिम महामार्गावर शुक्रवार, ३ में रोजी दुपारी पातूर येथील उड्डाणपुलाजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, तीनजण गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाइकाचे कुटुंब हे कारने (क्रमांक एमएच ३७-वी ५११) वाशिमकडून अकोल्याकडे येत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची पातूर येथील उड्डाणपुलाजवळ समोरासमोर धडक झाली. यामध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक (रा. वाशिम), शिवानी अजिंक्य आमले (रा. – नागपूर), अस्मिता अजिंक्य आमले (रा. नागपूर) व आस्टूल रहिवासी मेहकरचे दोन युवक वाशिम जिल्ह्यात ठार डोणगाव (जि. बुलढाणा) : वाशिम जिल्ह्यात घडलेल्या अपघातात मेहकर येथील दोन युवक जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री मंगळरुळपीर रस्त्यावर कोळंबी फाट्याजवळ घडली. अंकित खडसे (२८) आणि निखिल शेळके (२९) अशी मृतांची नावे आहेत. अमोल शंकर ठाकरे, कपिल प्रकाश इंगळे, सिद्धार्थ यशवंत इंगळे हे सहाजण ठार झाल्याची माहिती आहे. जखमी पीयूष देशमुख, सपना देशमुख, श्रेयस सिद्धार्थ इंगळे यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी भेट दिली.
Web Title: two-car accident 6 people were killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study