Home अहमदनगर अहमदनगर: शॉक बसून दोन शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

अहमदनगर: शॉक बसून दोन शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

Breaking News | Ahmednagar:  महावितरणच्या तुटलेल्या तारेला चिकटले.

Two children died on the spot due to shock

अहमदनगर : महावितरणच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीज वाहिनीची तार तुटून खाली पडली. या तारेला चिकटून शॉक बसल्याने दोघा शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर-कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात नेप्ती (ता. नगर) गावच्या शिवारात मंगळवारी (दि.२४) सायंकाळी घडली. होते.

त्या बंधाऱ्याजवळून महावितरणची वीजवाहिनी गेलेली आहे. या वाहिनीची एक तार तुटून ती बंधाऱ्याजवळ पडलेली होती. त्या तारेतून बंधाऱ्याच्या पाण्यात वीज प्रवाह उतरलेला होता.

या दुर्घटनेत आकाश लालू निसाद (वय १२) व घनश्याम राजू मुखीचा (वय १२, दोघे रा. दिनेश हॉटेल पाठीमागे, कल्याण रोड) या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या बरोबर गेलेला आणखी एक जण बचावला आहे. तिघे मुले मंगळवारी (दि. २४) सायंकाळी ४:३० ते ५ च्या सुमारास नेप्ती शिवारात रेल्वे लाइनच्या पुढील बाजूस बायपास रस्त्याच्या जवळ असलेल्या एका बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेले मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एक जण पाण्यात उतरताच, त्याला विजेचा शॉक बसून तो पाण्यात बुडाला. दुसरा तेथून पळायला लागला. मात्र, त्याचा तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्यालाही शॉक बसला. त्यामुळे दोघांचा जाग्यावरच मृत्यू झाला.

हे पाहून त्यांचा तिसरा साथीदार घाबरून घराकडे पळत आला. त्याने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर मयत मुलांच्या नातेवाइकांनी, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two children died on the spot due to shock

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here