दोन गटांत राडा, चाकू, तलवार यांचा वापर करीत मारहाण, तणावाचे वातावरण
Breaking News | Ahmednagar: लहान मुलांच्या खेळण्यावरून मोठ्यांत वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात दांडे, चाकू, तलवार यांचा वापर शहरात तणावाचे वातावरण.
कोपरगाव: शहरातील नियोजित शंकर अण्णा घंगारे उद्यानात लहान मुलांच्या खेळण्यावरून मोठ्यांत वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यात दांडे, चाकू, तलवार यांचा वापर करण्यात आला. घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. दरम्यान शहरात तणावपूर्ण वातावरण होते.
गांधीनगर-महादेवनगर या भागात शंकर अण्णा घंगारे यांच्या नावाने नियोजित उद्यान आहे. या जागेत खा. सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून खेळणी व ओपन जीम उभारण्यात आली आहे. येथे रविवारी सायंकाळी लहान मुले खेळत होती. त्यांच्यात किरकोळ वाद झाले. त्यात मोठ्यांनी उडी घेतली. त्याचे पर्यावसन दोन गटांत तुंबळ हाणामारीत झाले. यात दांडे, चाकू, तलवारी यांचाही वापर करण्यात आला. या घटनेत तौसिफ़ अकील पठाण, अर्शद अमीन पठाण, शोएब करीम शेख, आवेस मुस्ताक शेख, मतीन जाकीर सय्यद (रा. गांधी नगर) हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरे हे आपल्या पोलिस कर्मचान्यांसह पटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमाव पांगवून परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरा पर्यंत सुरू होती.
Web Title: two groups beating using swords, knives, swords, the atmosphere of tension
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study