संगमनेरमध्ये दोन चोऱ्यांच्या घटना, भीतीचे वातावरण
Sangamner News: संगमनेर शहरात दोन चोऱ्यांच्या (Theft) घटना समोर आल्या आहेत.
संगमनेर: संगमनेर शहरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे काय नाव घेईना पायी जाणार्या दोघा चोरट्यांनी दुचाकीवरून येवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून पसार झाले तर दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी घरात घुसून दोन तोळे सोन्याचे नॅकलेससह टीव्ही चोरून नेहमीप्रमाणे पळवून जाण्यात यशस्वी झाले आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले झाले आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरा पासून काही अंतरावर असलेल्या राहणेमळा- गुजांळवाडी येथे नामदेव सोमनाथ सोनवणे हे राहात आहे. सोमवारी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोनवणे यांच्या घरात प्रवेश करून घरातील टीव्हीसह सोन्याचा नॅकलेस चोरून पसार झाले आहे. याप्रकरणी नामदेव सोणवने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८२७/२०२३ भादवि कलम ३८०,४५७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत शांताबाई शिवराम आंबरे ही महिला माऊली कृपा काॅलनी मालदाड रोड येथील राहणार आहे. त्या व त्यांची मैत्रीण उषा घुले या मालदाड रोड येथून फिरूण घरी जात होत्या याच दरम्यान दोघे चोरटे पाठीमागून दुचाकीवरून येवून शांताबाई यांच्या पुढे गेले व पुन्हा पाठीमागून ओळून जवळ येत शांताबाई यांच्या गळ्यातील सोन्याची चैन असलेले गंठण बळजबरीने ओढून दुचाकीवरून पळून गेले. शांताबाई यांनी आरडाओरड केली असता.आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.तोपर्यंत चोरटे दिसेनासे झाले. याप्रकरणी शांताबाई आंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्याविंरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Two incidents of theft in Sangamner, atmosphere of fear
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App