कोपरगाव-संगमनेर रोडवर दुचाकीच्या अपघातात दोन ठार
Breaking News | Ahmednagar Accident: दोन मोटारसायकलच्या अपघात होऊन यामध्ये दोनजण जागीच ठार.
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात कोपरगाव-संगमनेर रोडवर पोहेगाव कॅनल जवळ दोन मोटारसायकलच्या अपघात होऊन यामध्ये दोनजण जागीच ठार झाले तर एक महिला जखमी झाली. तर पोहेगाव-सोनेवाडी रोडवर डंपरने दुचाकीला उडवत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर पोहेगाव हद्दीत गोदावरी उजव्या कॅनलजवळ दोन मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून एकजण जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली.
मोटारसायकल (एम.एच १५ जी.डब्लू, ००३६) ही व मोटारसायकल क्रमांक (एम.एच.१५ जी.झेड. ९६७३) यांची धडक होऊन त्यात भाऊसाहेब अंतु केदारे (वय ६०, रा. पारेगाव रोड, येवला) व करण सुभाष थोरात (वय १९, रा. कोपरगाव) हे दोघेजण जागीच ठार झाले तर एकजण जखमी झाला आहे.
स्थानिकांनी त्यांना तातडीने शिर्डी येथे उपचारासाठी नेले परंतु ते डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकावर शिर्डी येथे उपचार सुरू आहेत.
तर दुसरा अपघात
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव-सोनेवाडी रस्त्यावर, नऊचारी जवळ झाला. शेतीचे कामे आवरून येत असताना पोहेगावच्या दिशेने आलेल्या डंपरने महिलेला धडक दिली. यात महिला जागीच मरण पावली.
नऊचारी परिसरातून शेतातून आपल्या दुचाकीवर तुषार रामदास वाघ आईला पोहेगाव येथे घरी घेऊन चालला होता. रस्त्यावर नऊचारी ओलांडून स्कूटी रोडवर आली असता सोनेवाडीच्या दिशेने आलेल्या डंपरने स्कूटीला जोरदार धडक दिली. यामध्ये वंदना रामदास वाघ (वय ४८) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. शिर्डी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह राहता ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी अॅम्बुलन्स झगडे फाटामार्गे नऊचारीकडे येत असताना पाऊस झाल्याने खडीकरण झालेल्या रस्त्यावर पलटी झाली. सुदैवाने चालकाला काही झाले नाही. नंतर दुसऱ्या अॅम्बुलन्सने हा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
Web Title: Two killed in two-wheeler accident on Kopargaon-Sangamaner road
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study