Nashik Accident News: इगतपुरीजवळ दुर्घटना, रस्त्यालगत उभ्या वाहनाला धडक दिल्याने अपघात.
इगतपुरी : मुंबई-नाशिक महामार्गावरील इगतपुरीजवळ रविवारी (दि. २४) सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत असताना साई कुटीर परिसरात दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे, (दोघे रा. धार्णोली, वैतरणा ) ही मृतांची नावे आहेत.
नाशिक – मुंबई महामार्गालगत एक बंद पडलेले वाहन उभे असताना त्याच्या मागील बाजूला बॅरिकेड्स लावले होते. त्या वाहनाच्या मागे आणखी एक वाहन उभे होते. मात्र पहाटेच्या सुमारास महिंद्रा कंपनीतून सुटी झाल्यानंतर एकाच दुचाकीवर घरी परतणाऱ्या ट्रिपल सिट दुचाकीस्वारांच्या ही उभी वाहने लक्षात आली नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी बॅरिकेड्स तोडून थेट रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनावर जाऊन आदळली. यात दोन जणांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना समजताच घटनास्थळी पोहोचलेल्या इगतपुरी पोलिसांच्या पथकाने जखमींना टोल प्लाझा रूग्णवाहीकेतून ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय सुत्रांनी जखमींपैकी दोघांना मृत घोषित केले व एका जखमीला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे, (दोघे रा. धार्णोली, वैतरणा ) ही मृतांची नावे असून, भाऊ भगत (रा. खंबाळे) हे गंभीर जखमी आहेत.
दररोजच्या बातम्या मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज
रस्त्यालगत वाहन उभे करणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा
पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, महामार्ग सुरक्षा पोलीस उपनिरीक्षक हरी राऊत, पोलीस हवालदार विजय रुद्रे व पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा केला असून, उभ्या असलेल्या वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलिसांनी तत्परतेने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दुचाकीवरील तिघेही महिंद्रा कंपनीचे कामगार असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहेत.
Web Title: Two killed, one seriously in two-wheeler accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App