धक्कादायक! रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बलात्कार
Pune Crime: लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
लोणावळा: पुण्यातील पर्यटणासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा येथील रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बेताब आनंद पवार, मंदा बेताब पवार, संजना बबलू पवार, बबलू पवार, अर्चना बेताब पवार, किरण बेताब पवार, मोनिका बेताब पवार, राज सिद्धेश्वर शिंदे, करीना राज शिंदे (सर्व रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात या एक अल्पवयीन मुलगी थांबली होती. यावेळी दुचाकीवरून दोघे जण आले. त्यांनी या अल्पवयीन मुलीचे गडीवरून नेत अपहरण केले. तिला येथील हनुमान टेकडी परिसरात एका घरात साखळीने बांधून कोंडून ठेवण्यात आले. आरोपींनी तिला मारहाण केली तसेच तिच्यावर बलात्कार केला.
दुसऱ्या घटनेत उत्तरप्रदेशातील एका अल्पवयीन मुलीचे लोणावळा रेल्वे स्थानक परीसरातून अपहरण करण्यात आले. ही मुलगी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबली असतांना आरोपींनी तिला पळवून नेले. यावेळी तिला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा मोबाइल देखील आरोपींनी हिसकावून घेतला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिग ब्रेकिंग. बारामती ॲग्रो कंपनीला सरकारची नोटीस, रोहित पवारांचा २ नेत्यांवर गंभीर आरोप
करीना राज शिंदे, मंदाकिनी बेताब पवार, संजना बबलू ठाकूर, बबलू पवार, राज सिद्धेश्वर पवार, बेताब आनंद पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे विभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डुबल पुढील तपास करत आहेत.
Web Title: Two minor girls were kidnapped and rape from the railway station area
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App