संतापजनक! मानलेल्या मामाकडून दोन भाचींवर अत्याचार
Breaking News | Nashik Crime: मानलेल्या मामाकडून दोन भांचीनवर लैंगिक अत्याचार (Sexual abused) झाल्याचे समोर आले.

नाशिक: नाशिक मधून एक संतापजनक आणि नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मानलेल्या मामाकडून दोन भांचीनवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ही घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडली. मुलींच्या आईने याप्रकरणी फिर्यादी दिली आहे. या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिस ठाण्यात बलात्कार,पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलींची आई आणि संशयित आरोपी यांची 10 वर्षांपेक्षा अधिकची ओळख होती. संशयित आरोपी हा पीडित मुलींचा मानलेला मामा आहे. तो मूळचा यूपी
येथे राहणारा व सध्या मालेगाव येथे वास्तव्यास होता. दोघे एकमेकांना भाऊ बहीण मनात होते. पीडित मुलींच्या आईने मुलांकडे लक्ष रहावे म्हणून मानलेल्या भावावर विश्वास ठेवत त्याला आपल्या मुलींकडे घरी एकट्या असल्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.
मात्र त्याने याचा गैरफायदा घेत त्यांच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आले. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केले. ही गोष्ट पीडित मुलींच्या आईच्या मैत्रिणीच्या लक्षात आली आणि तिने हि बाब पीडित मुलींच्या आईला लक्षात आणून दिले. त्यानंतर हे बाब लक्षात येताच पीडित मुलींच्या आईने इंदिरानगर पोलिस ठाणे गाठून संशयित मानलेल्या मामा विरोधात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार, इंदिरानगर पोलिसांनी फिर्याद नोंदवली असून, महिलेच्या मानलेल्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. घडलेल्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून नराधम आरोपीला कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.
Breaking News: Two nieces abused by their supposed maternal uncle

















































