प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या मुलासह दोघांनी तरुणीवर सतत अत्याचार, गुन्हा दाखल
Pune Crime: एका मुलीवर दोघा जणांनी सतत धमक्या देऊन चार वर्षे अत्याचार (Rape) केला असल्याची धक्कादायक घटना.
पुणे : पुण्यातील इंदापूर तालुक्यात एका मुलीवर दोघा जणांनी सतत धमक्या देऊन चार वर्षे अत्याचार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या फिर्यादीवरून भिगवण आणि सिद्धेश्वर निंबोडी येथील दोघांवर धमकी देऊन बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रसिद्ध व्यापार्याच्या मुलाचा समावेश आहे. आकाश ऊर्फ बंटी पिसाळ (रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) आणि साहिल अमीन शेख (रा. सिद्धेश्वर निंबोडी, ता. बारामती) या दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलीची परिस्थिती गरीब असल्याने तिला शिक्षण पूर्ण करायचे असल्याने ती दुकानात कामाला येत असे. यावरून आकाश ऊर्फ बंटी पिसाळ याने तिचा पाठलाग करून प्रेमाचा प्रस्ताव ठेवला व तिचा पाठलाग सुरू केला. सततच्या या त्रासाला कंटाळून मुलीने कामाची जागा बदलली तरीही आकाश त्रास देत होता. हा प्रकार पीडितेने घरी सांगितला असता तर पुढील शिक्षणासाठी अडचणी आल्या असत्या म्हणून भीतीपोटी पीडितेने घरी काही सांगितले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
यावर आकाश याने फ्रेंडशिपची नवी शक्कल लढवली व मोबाईल नंबर मिळवून जवळीक साधत मोबाईलवर चॅटिंग करू लागला. याचदरम्यान आपण जिथे कामाला होतो तिथे साहिल आमीन शेख हाही माझ्यावर नजर ठेवून होता. त्याने आपले काही आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले होते व ते व्हायरल करण्याची धमकी देत त्रास देत होता. मदतीच्या अपेक्षाने ही बाब आपण आकाश पिसाळ यास सांगितली. यावर त्याने त्यासाठी प्रेमाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर त्याने आपल्याला भेटीच्या निमित्ताने बोलावून अत्याचार केला व पुढेही करीत राहिला.
याचप्रमाणे साहिल यानेही आपल्याला फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत बारामती व भिगवण भागात बलात्कार केले. हा प्रकार २०१९ पासून ते २०२३ पर्यंत चालू असल्याचं फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच २०२३ मध्ये या दोघांनी फोटो व व्हिडिओ इन्स्टाग्राम, यु-ट्युब, सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार आपल्यावर अत्याचार केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Two of them, including the son of a famous businessman, Rape
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App