संगमनेरातील दोघे तेल चोर पसार, ३० लाखाच्या तेलाचा अपहार
संगमनेर | Crime: गुजरात येथून ट्रकमधून आणलेले ३० लाख ६ हजार रुपयांचे तेल पुणे येथील व्यापाऱ्याला पोहोच न करता तेलाचा अपहार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर येथील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुजरात येथील व्यापारी अशोककुमार चौधरी वय ३२ सुरत याने गुजरात येथून तेलाचा ट्रक पाठविला होता. या ट्रकमध्ये २७ लाख ५३ हजार ९३९ रुपये किमतीची सोया आईल तेलाचे डबे व लाख ५२ हजार ६३२ रुपये किमतीची तेल असा एकूण ३० लाख ६ हजार ५७१ रुपयांचा माल होता. हा माल ठरल्याप्रमाणे बसंत ट्रेडिंग पुणे येथे पाठविणे आवश्यक होता. मात्र हा माल पुणे येथे पाठविण्यात आला नाही. दिनांक ३० मे ते २ जून दरम्यान घडला. आपल्या मालाचा अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अरुण उदमल व अफजल साहिबखान पठाण रा. दोघेही संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक माळी हे करीत आहे. हे दोघही ट्रकसह फरार आहेत.
Web Title: Two oil thieves pass through Sangamner crime filed