अकोलेत सोन्याचे दुकान फोडण्याचे तयारीत असणारे दोघे अटकेत
Breaking News | Akole: अकोले शहरातील सोन्याच्या दागिन्यांचे दुकान फोडून चोरी करण्याच्या अवस्थेत असलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. शनी मंदिर परिसरात जाऊन सोन्याची पेढी फोडण्याचा प्रयत्न करीत असताना पकडले.
अकोले : अकोले शहरातील सोन्याच्या दागिन्यांचे दुकान फोडून चोरी करण्याच्या अवस्थेत असलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. शहरात रविवारी पहाटे टेलरिंग व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे सोन्याच्या दागिन्यांचे दुकान फोडून चोरी करताना दोघांना अटक केली.
याबाबत माहिती अशी की, अकोले शहरात मध्यवस्तीत कोल्हार घोटी रोड जवळपास शनी मंदिर परिसरात सोन्याचे दोन-तीन दुकाने आहेत. यातील मैड ज्वेलर्स या एका दुकानाच्या छतावर चढून दोन चोर पहाटे चोरीच्या उद्देशाने पत्रे उचकटत होते. याच परिसरात रात्रीच्या वेळी अनिल वलवे हे टेलर आपल्या दुकानात कपडे शिवणकाम करीत होते. आवाज कशाचा येतो हे पाहण्यासाठी ते बाहेर आले, तर सुवर्णकार मैड यांचे दुकानावर दोन चोर पत्रे उचकटत होते. त्यांनी सुवर्णकार व पोलिस यांना फोन केला. त्याच वेळी संगमनेरकडून रात्रीची गस्त घालणारी पोलिस गाडी तेथे आली आणि पोलिसांनी प्रसाद रामदास दुधात (वय २३, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) व आदित्य पुरुषोत्तम सोनवणे (वय २४, रा. भगूर) या दोघांना ताब्यात घेतले.
Web Title: Two people who were preparing to break the gold shop Arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study