Home पुणे दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून हत्या, ड्रममध्ये मृतदेह आढळले  

दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून हत्या, ड्रममध्ये मृतदेह आढळले  

Breaking News | Pune Crime: दोन अल्पवयीन मुलींच्या हत्यानंतर नातेवाईक संतप्त झाले आहेत दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह ड्रम मध्ये आढळून आले.

Two Sakhya sisters were abused to death, bodies found in a drum

पुणे: पुण्यातील राजगुरुनगर येथील पोलीस स्टेशन बाहेर नागरिकांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे पोलिसांसोबत चर्चा करून नातेवाईक आंदोलनावरती ठाम आहेत पुण्यातील राजगुरुनगर मध्ये झालेल्या दोन अल्पवयीन मुलींच्या हत्यानंतर नातेवाईक संतप्त झाले आहेत दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह ड्रम मध्ये आढळून आले होते या चिमुकल्या मुलींच्या घराशेजारीच राहत असलेल्या एका 54 वर्षाच्या नराधमाने मुलींवरती अत्याचार करून त्यांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सध्या कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झाले आहेत त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर या आंदोलन केले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजगुरुनगर मध्ये दोन लहान मुलींचे मृतदेह एका टाकीमध्ये आढळून आले, ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये एका आरोपीचे नाव समोर आलं आहे. त्याने हे कृत्य केल्याचं देखील कबूल केलं आहे. चौकशीमध्ये आरोपीने त्या लैंगिक अत्याचार करून पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची कबूल केलं आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये त्याने एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं कबूल केला आहे, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनी दिली आहे.

पुण्यातील राजगुरूनगर येथे घराजवळ काल दुपारी (बुधवारी) खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजुला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 8 आणि 9 वर्षांच्या दोन बहिणी होत्या. पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला आहे. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपलं बिंग फुटेल या भीतीने तिने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर घाबरलेल्या आचाऱ्याने दुसरी बहिणीचा तसाच जीव घेतला. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रम मध्ये मृतदेह ठेवले.

घटनेनंतर नातेवाईक आणि नागरिकांनी संतापून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे या दोन चिमुकल्या बहिणींची अत्याचार करून हत्या केली आहे आणि त्या दोघींच्या मृतदेह जवळच असलेल्या ड्रम मध्ये ठेवले होते. या प्रकरणातील आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आरोपी पळून जाताना पोलिसांनी त्याला पकडला आहे. मुलींचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, आरोपीला फाशी झालीच पाहिजे. नातेवाईकांना राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केला असून पोलीसांसोबत चर्चा करुन नातेवाईक आंदोलनावर ठाम आहेत.

पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. अजय दास असे नराधम आरोपीचे नाव आहे. नराधम आरोपीने मुलींचा खुन करुन परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी पुण्यातून आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनी दिली आहे.

Web Title: Two Sakhya sisters were abused to death, bodies found in a drum

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here