Home अकोले ट्रकखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

ट्रकखाली चिरडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

Nashik Accident: ट्रकखाली दुचाकी सापडून दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना. (Death)

Two school children died after being crushed under a truck

मनमाड : धावत्या ट्रकखाली दुचाकी सापडून दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ६) चांदवड रस्त्यावरील बाजार समितीसमोर घडली. दोघे शाळा सुटल्यानंतर दुचाकीवर घरी परतत असताना, रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. वैष्णवी प्रवीण केकाण (१५) आणि आदित्य मुकेश सोळसे (१५) दोघे रा. हनुमाननगर अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक वृत्त असे, वैष्णवी आणि आदित्य हे दोघे स्वामी विवेकानंद हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते. बाजार समितीसमोर नेहमीप्रमाणे ठाण मांडून बसलेल्या जनावरांपैकी काही जनावरे अचानक उठले. त्यांच्याशी धडक होण्यापासून स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्न दुचाकी ट्रकला धडकून अपघात झाला. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. सभोवतालच्या नागरिकांनी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

Web Title: Two school children died after being crushed under a truck

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here