Home अहिल्यानगर अहिल्यानगर: दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता, फूस लावून पळवून…..

अहिल्यानगर: दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता, फूस लावून पळवून…..

Breaking News | Ahilyanagar Crime: अज्ञात आरोपींनी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या आईने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद.

Two sisters missing

केडगाव : अहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि २१ वर्षीय तरुणी, अशा दोघी सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्या आहेत. त्यांना अज्ञात आरोपींनी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या आईने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २३ मे रोजी दुपारी १२ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

 दोघी बहिणी घरी होत्या, तर त्यांचे कुटुंबीय बाहेर गेलेले होते. रात्री कुटुंबीय घरी आले तेव्हा त्यांना मुली घरात आढळून आल्या नाहीत. त्यांचा दरेवाडी परिसर, नातेवाईक व मुलीच्या मैत्रिणीकडे चौकशी करून शोध घेतला असता त्या कोठेही मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीतरी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांच्या आईने भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिली.

Breaking News: Two sisters missing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here